गाडगेबाबा अभियांत्रिकीत भावी अभियंत्यांसाठी 21 रोजी ‘मॉक टेस्ट’

0
भुसावळ- राज्यातील अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक वर्ष 2018-19 च्या प्रवेशासाठी एमएचटी सीईटी ही सामायीक प्रवेश परीक्षा 10 मे रोजी घेण्यात येणार आहे. ही परीक्षा राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या बारावीच्या अभ्यासक्रमावर आधारीत असणार आहे. विद्यार्थ्यांना प्रमुख परीक्षेचा सराव व्हावा या अनुषंघाने 21 एप्रिल रोजी महाविद्यालयात ‘मॉक टेस्ट’चे आयोजन करण्यात आल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.सिंह कळवतात.
भौतीकशास्त्र व रसायनशास्त्र या विषयांची प्रत्येकी 50 गुण असलेली सामायिक प्रश्‍नपत्रिका असेल तर गणित 100 गुण आणि जीवशास्त्र 100 गुण असलेल्या स्वतंत्र प्रश्‍नपत्रिका असणार आहेत. सकाळी 11.30 वाजता पेपर -1 आणि दुपारी 2.30 वाजता पेपर-2 सुरू होईल, असे प्रा.दिनेश पाटील (मॉक टेस्ट प्रमुख) यांनी सांगितले. यासाठी परिसरातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा असे आव्हान महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आलेले आहे. अधिक माहितीसाठी प्रा.अनिकेत पाठक, प्रा.अभिजीत इंगळे यांच्याशी संपर्क साधण्याचे कळवण्यात आले आहे. या परीक्षेसाठी महाविद्यालयातर्फे भुसावळ शहरातून 21 रोजी सकाळी 8.30 वाजता गांधी पुतळा तसेच विविध ठिकाणाहून मोफत बस सुविधा देण्यात येणार आहे.