गाडगेबाबा अभियांत्रिकीत अत्याधुनिक प्रॉडक्ट डिझाइन इंजिनिअरींगवर 7 पासून कार्यशाळा

0

राज्यभरातील 30 पेक्षा जास्त प्राध्यापक घेणार सहभाग

भुसावळ- भारत सरकारच्या तांत्रिक शिक्षण गुणवत्ता सुधार कार्यक्रमाच्या तिसर्‍या टप्प्यावर आधारित डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाने प्रॉडक्ट डिझाइन इंजिनिअरींगमध्ये अभ्यासक्रम सुरू केला असून नव्याने सुरू झालेल्या अभ्यासक्रमावर प्राध्यापकांसाठी या मालिकेत पाचवा एफडीपी (फ्याकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम) कार्यशाळेचे श्री संत गाडगे बाबा कॉलेज ऑफ इंजिनिअरींग टेक्नॉलॉजीमध्ये 7 ते 11 डिसेंबर दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी अभ्यास समन्वयक डीबीएटीयू-लोनेरे येथील प्रा.एस.यू.वायकर व श्री संत गाडगे बाबा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग भुसावळचे प्रा.डॉराहुल बी.बारजिभे असून 30 पेक्षा जास्त अभियांत्रिकीचे प्राध्यापक त्यात सहभागी होणार आहेत. भविष्यातील रोजगार संधी ओळखून उद्यमशीलतेला पुरेपूर वाव देण्यासाठी महाविद्यालयीन युवकांना विशेष कौशल्याचे प्रशिक्षण देण्याआधी प्राध्यापकांनी प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे म्हणून जास्तीत जास्त संख्येने सहभाग नोंदविण्याचे आवाहन प्राचार्य डॉ.आर.पी. सिंह यांनी केले आहे.