गाडगेबाबा चौकात किरकोळ कारणावरून तरूणाला लोखंडी सळईने मारहाण

0

जळगाव। दुध केंद्रावर उभ्या असलेल्या तरूणाला बाजूला हो बोलल्यानंतर तरूणाने त्यास थांबण्यास सांगितल्याच्या कारणावरून चौघांनी तरूणाला शिवीगाळ करून लोखंडी पाईप व सळईने बेदम मारहाण केल्याची घटना गाडगेबाबा चौकातील विकास दुध केंद्राजवळ शनिवारी 9.30 वाजता घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसा ठाण्यात चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देवेंद्र नगरातील रहिवासी शरद पंडीत सपकाळे वय-30 हे शनिवारी रात्री 9.30 वाजता गाडगेबाबा चौकातील विकास दुध केंद्रावर उभे होते. त्यावेळी संजय पोपटकर हा तेथे आला आणि सपकाळे यांना बाजूला हो बोलला. यातच सपकाळे यांनी संजय पोपटकर याला थांबण्यास सांगितले मात्र, याचा राग येवून संजय पोपटकर व अन्य तिन जणांनी मिळून शरद सपकाळे यांना शिवीगाळ करून लोखंडी पाईप व सळईने मारहाण केली. यात शरद हे गंभीर जखमी झाले. यानंतर शरद यांची दुचाकी पाडून तिघांनी नुकसान केले तर त्यांच्यासोबत असलेल्या मित्राला देखील मारहाण करून त्यांच्या खिशातील हजार रुपये पाडले. याप्रकरणी अखेर आज रविवार शरद सपकाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात संजय पोपटकर व अन्य तिन जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.