गाडीत पेट्रोल कमी भरल्यावरून वाद विकोपाला : दहा जणांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा

मुक्ताईनगर : वाहनात पेट्रोल कमी टाकले या कारणावरून उफाळलेल्या वादानंतर तालुक्यातील घोडसगाव जवळील भोलेनाथ पेट्रोलपंपातून दहा संशयीतांनी 35 हजारांचा लांबवल्याने संबंधितांविरोधात मुक्ताईनगर पोलिसात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. ोडसगाव जवळील भोलेनाथ पेट्रोलपंपाजवळ व बाजुला असलेल्या ढाब्यावर अर्जुन सांगळकर , राजु ठाकरे, गणेश सांगळकर व इतर 7 ते 8 जणांनी पंपावर येत गाडीमध्ये कमी पेट्रोल टाकले या कारणावरुन 1 मार्च रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास वाद घातला व पंपावरील ज्ञानेश्वर पाटील यांच्याजवळील पेट्रोल विक्रीचे 34 हजार 890 रुपये जबरीने हिसकावुन त्याला पाण्याचे नळीने मारहाण करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी ज्ञानेश्वर पाटील यांच्या फिर्यादीवरुन मुक्ताईनगर पोलिसात वरील तिघांसह इतर 7 ते 8 जणांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक सुरेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास हवालदार संजय पाटील करीत आहेत.