शहर वाहतूक शाखेतर्फे पोलीस स्थापना दिनानिमित्त जनजागृती रॅलीः विद्यार्थ्यांच्या घोषणांनी दणाणले शहर
जळगाव: शहर वाहतूक शाखेतर्फे गुरुवारी पोलिस दलाच्या स्थापना दिनानिमित्त वाहतुक नियमांबाबत जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीत शहरातील अनेक शाळांमधील 500 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग होता. वाहतूक नियमांचे फलक घेतलेले फलक शहरवासियांचे लक्ष वेधून घेत होते. वाहन चालवितेवेळी नशा करु नका, मत करो इतनी मस्ती, जिंदगी नही सस्ती, छोट्यांच्या हातात देवू नका चाबी, स्वतःच्या हाताने कराल बरबादी, गाड्यांशी करु नका स्पर्धा जीवनाचा खेळ करु नका ,अर्धा हेड फोन के साथ सफर कही आखरी ना होय जाये, अशा विद्यार्थ्यांच्या घोषणांनी जळगाव दणाणले होते.
वाहतूक नियमांबाबत मुलांनी पालकांकडे आग्रह धरावा
वाहतुक शाखेच्या मैदानावर शहरातील विवीध शाळेतील विद्यार्थी, स्काऊड गाईडचे विद्यार्थी सकाळी 9 वाजताच रॅलीसाठी हजर होते. हिरवी झेंडी दाखवून मान्यवरांच्या हस्ते रॅलीचे शुभारंभ करण्यात आले. वाहतूक शाखा , कोर्ट चौक ते नेहरु चौक मार्गे पुन्हा वाहतूक शाखेजवळ रॅलीचा समारोप झाला. शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक देवीदास कुनगर, पोऊनि दिलीप पाटील, एकनाथ जोशी, मुझफ्फर मास्तर, मेघना जोशी, योगेश पाटील, नामदेव माळी, सोपान पाटील, चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती होती. यावेळी देविदास कुनगर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कुनगर यांनी पोलीस स्थापना दिनाचे महत्व विषद करत, विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत आग्रह धरावा, असे आवाहन केले. तसेच काही घटना अनुचित प्रकार असल्यास निर्भया पथकास संपर्क साधावा असेही त्यांनी सांगितले.
एमआयडीसी पोलीस ठाणे
एमआयडीसी पोलिस ठाण्यातही पोलीस स्थापनादिनानिमित्ताने दिवसभर विविध शाळांनी भेट दिली, शाळकरी विद्यार्थ्यांना पोलिस ठाण्याचे स्वागतकक्ष, ठाणे अंमलदार, सीसीटीएनएस, पत्रव्यवहार शाखा, पोलिस ठाण्यातील कोठडी, मुद्देमाल कक्ष आणि गुन्हेशोध पथकाची इंत्यभुत माहिती निरीक्षक रणजीत शिरसाठ यांच्यासह पोलिस अधीकारी कर्मचार्यांनी दिली. प्रेमाबाई जैन विद्यालय, इकरा शाईन, जयदुर्गा माध्यमीक विद्यालय, बी.यु.एन रायसोनी स्कुलचे शिक्षक आणि विद्यार्थी सहलीत सहभागी झाले होते.
जनजागृतीपर घोषणांनी शहर दणाणले
शहरातील लुंकड माध्यमिक विद्यालय, शेठ ला.ना. विद्यालय, आर.आर. विद्यालय, जय भवानी माध्यमिक विद्यालय, सिध्दी विनायक माध्यमिक विद्यालय, प.वि.पाटील, सु.ग.विद्यालय या शाळांमधील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने रॅलीत सहभाग नोंदविला. वाहन चालवितेवेळी नशा करु नका, मत करो इतनी मस्ती, जिंदगी नही सस्ती, अज्ञाताला वाहन सोपवणे गुन्हा, छोट्यांच्या हातात देवू नका चाबी, स्वतःच्या हाताने कराल बरबादी, नियम पाळा, अपघात टाळा, वेगावर नियंत्रण म्हणजे वेगावर नियंत्रण, गाड्यांशी करु नका स्पर्धा जीवनाचा खेळ करु कना अर्धाा, आवरा वेगाला सावरा जीवाला, ध्वनीप्रदूषण टाळा, हेल्मेटचा वापर करा, नियम पाळण्यात सहकार्य करा विद्यार्थ्यांच्या या घोषणांनी कोर्ट तसेच नेहरु चौक परिसर दणाणला होता. घोषणांचे फलक असलेले विद्यार्थ्यांनी शहरवासियांचे लक्ष वेधले होते.