गाडी लावण्यावरून वाद विकोपाला : तरुणाला बेदम मारहाण

जळगाव : शहरातील मासूमवाडी चौकात गाडी लावण्याच्या कारणावरून तरूणाला पाच ते सहा जणांनी बेदम मारहाण केली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

शिविगाळ करीत मारहाण
शहरातील कासमवाडी परीसरातील अफसर खान जाकीर खान (21) हा तरुण रीक्षा चालवून आपला उदनिर्वाह करतो. अफसर हा गुरुवारी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास मासुमवाडी चौकातील महाराष्ट्र बर्फ गोलावाला रामदेव यांच्याकडे गोळा खाण्यासाठी गेला असता या ठिकाणी जाकीर शिकलीकर, जावेद शिकलीकर, आवेश शिकलीकर, गुड्डू उर्फ तंबाखू, अण्णा गुड्डूचा भाऊ, सिद्धीक शिकलीकर, जाकीर शिकलीकर (सर्व रा. मासुमवाडी) यांच्यासह इतर व्यक्ती हे त्याठिकाणी आले. त्यांनी गोळा विक्रेत्याला गाडी काढण्यास सांगितले. यावेळी अफसर खान जाकीर खान यांनी त्या तरुणांना रामदेव याला त्याचा धंदा करु द्या, असे बोलला. त्याचा राग आल्याने त्या तरुणांनी अफसर खान यांना शिवीगाळ करीत मारहाण केली तर एकाने अफसरच्या डोक्यात दगड मारला तर इतरांनी लाठ्या-काठ्यांनी मारहाण करून जखमी केले. याबाबत अफसर खान याने एमआयडीसी पोलिसात धाव घेवून तक्रार दिल्याने एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास प्रदीप पाटील करीत आहे.