भुसावळ- युवकांच्या हाताला काम मिळावे, त्यांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव व लेवा पाटीदार बिझीनेस नेटवर्क यांचे संयुक्त विद्यमाने रविवार, 5 मे रोजी गाडेगाव, सुप्रीम इंडस्ट्रीजच्या बाजूला ह.भ. प. तोतराम महाराज समाधी स्थळ, ता. जामनेर येथे सकाळी 8.30 ते दुपारी 2.30 वाजेदरम्यान उद्योग, व्यवसाय, रोजगार, करिअर मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी 20 विविध खाजगी आस्थापनांनी एकूण 300 रीक्तपदांची मागणी कळविली आहे. रीक्त पदांसाठी शैक्षणिक पात्रता 10 वी, 12 वी, आय.टी.आय पास, बीए, बीएससी, बीकॉम, अभियांत्रिकी डिप्लोमा व इंजिनियरींग पात्रता धारक अशी आहे. उपस्थित राहणार्या उद्योजकांना विविध रीक्त पदांसाठी पात्र उमेदवारांची निवड करावयाची असल्याने उमेदवारांनी स्वखर्चाने मेळाव्यास उपस्थित रहावे तसेच मेळाव्यास येतांना शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे, बायोडाटा, पासपोर्ट फोटो आणावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या सुवर्ण संधीचा लाभ इच्छुक उमेदवारांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक संचालक अनिसा तडवी यांनी केले आहे.