गाडेगाव घाटात कारला अपघात

0

जळगाव । जळगाव-औरंगाबाद महामार्गावरील गाडेगाव घाटात होंडा अमेझ कारला समोरुन येणार्‍या आयशर ट्रकने जोरदार धडक दिल्याची घटना शनिवारी सकाळी आठ वाजेच्या पुर्वी घडली. या अपघातात चालकासह कार मधील चार जण जखमी झाले आहे. कारचा चुराडा झाला असून जखमींना तत्काळ सुप्रीम इंडस्ट्रीज आणि शासनाच्या 108 ऍम्बुलन्सद्वारे जळगावी खाजगी रूग्णालयात उपचारार्थ हलवण्यात आले. चौघांपैकी दोघांना गंभीर दुखापती झाल्या असून प्रकृती मात्र धोक्याबाहेर आहे. अपघात झालेल्या वाहनात जळगाव शहरातील गाळेधारक होते, औरंगाबाद येथे कायदेशीर सल्ला घेण्यासाठी जातांना त्याच्या वाहनाला अपघात झाला, अशी माहिती जखमींकडून मिळाली आहे.

औरंबादकडे जात असतांना झाला अपघात
वेगवेगळ्या वाहनाने औरंगाबादकडे जात असतांना अवघ्या चाळीस मिनिटातच पावणेआठ वाजेच्या सुमारास गाळेधारकांच्या वाहनांनापैकी होंडा अमेझ कार क्र (एमएच.19.बी.जे.7818) वरील चालक गाडेगाव घाटात वाहनाला ओव्हरटेक करीत असतांनाच समोरुन सुसाट वेगात येत असलेल्या पांढर्‍या रंगाच्या आयशर सारख्या ट्रक क्र (एम.एच.20.सी.टी.2067) या ट्रकने जोरधार धडक दिली. या अपघातात हितेश दिनेशचंद्र शहा (वय-38,रा.प्रतापनगर), फिरोज सलिमखान भिस्ती(वय-29रा.शाहुनगर भिस्तीवाडा),आशुतोष शेट्टी (वय-36) आणि चालक अमोल नारायण मराठे (वय-28,रा.ईच्छादेवी) जखमी झाले. जखमींचे जाबजबाब घेतल्यानंतर नेरी औटपोस्टला अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

कायदेशीर सल्ला घेण्यास खंडपीठात जात होते
जळगाव शहर महानगरपालीकेच्या मालकीच्या 28 पैकी 18 व्यापारी संकुलातील गाळे महापालीकेने ताब्यात घेण्याचा निकाल नुकताच बुधवारी औरंगाबाद खंडपिठाने दिला आहे. गेल्या पाच वर्षापासून न्यायीक लढा देत असलेल्या व्यापारी संकुलातील गाळेधारक औरंगाबाद खंडपिठाच्या निर्णयाने हवालदिल झाले असून व्यापार वाचवण्यासाठी त्यांनी धावपळ सुरु केली आहे. 18 पैकी 14 गाळेधारकांच्या संघटनेचे अध्यक्ष डॉ.शांताराम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आज काही गाळेधारक कायदेशीर सल्ला घेण्यासाठी वेगवेगळ्या वाहनांनी सकाळी 7 वाजता औरंगाबादकडे निघाले होते.

खाजगी रूग्णालयात उपचार सुरू
वेगवेगळ्या वाहनांनी औरंगाबादला जात असलेल्या वाहनांपैकी एका वाहनाचा अपघात झाल्याने पुढे चालत असलेल्या इनोव्हा कारमधील डॉ.शांताराम सोनवणे, राजेश कोतवाल, संजय पाटील, दिलीप दहाड, वसीम काझी यांनी त्याचे वाहन मागे फिरवुन जखमींना मदतीसाठी जळगावी फोन करुन मदत मागवली. सुप्रीम इंडस्ट्रीजची एक आणि दुसरी शासकिय रुग्णवाहीका(108)च्या मध्यमातून जखमींना जळगावी रवाना केले, वेगवेळ्या रुग्णालयात जखमींवर उपचार सुरु आहे. तसेच दोन जणांना जबर मार लागला असून त्यांची प्रकृति मात्र धोक्याबाहेर आहे. या अपघातामुळे मात्र, सर्वत्र खळबळ उडाली होती.