गाडेगाव येथे संंतप्त ग्रामस्थांनी हॉटेल व्यावसायीकाचे वाहन जाळले

0

जळगाव- जळगाव -औरंगाबाद मार्गावरील जामनेर तालुक्यातील गाडेगाव येथे संतप्त ग्रामस्थांनी जळगावातील हॉटेल व्यावसायिक श्याम भंगाळे यांचे चारचाकी वाहन जाळल्याची घटना शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास घडल्याने खळबळ उडाली. काही दिवसांपूर्वी गाडेगाव येथे भंगाळे यांच्या भरधाव वाहनाने एस.टी. बसमध्ये चढणार्‍या शाळकरी मुलांना चिरडले होते. त्यात एका मुलीचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून ग्रामस्थ भंगाळे यांच्यावर संतप्त होते. शनिवारी त्यांचे वाहन या भागातून जातांना दिसताच ग्रामस्थांनी या वाहनालाच आग लावली.