गाड्या रद्द मुळे प्रवाश्यांचे हाल

0

अमळनेर । गिरणा नदीवरील पुलाचे काम सध्या शेवटच्या टप्प्यात असल्याने पॅसेंजर गाड्या 21 नोव्हेंबर 2017 पर्यंत बंद करण्यात आल्या आहे तर काही गाड्या या कामाच्या वेळेत असल्याने वळविण्यात आल्याने प्रवाश्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. तर नंदुरबार ते सुरत पॅसेंजर गाड्या सुरू आहे, पण या भागातील कामाच्या वेळेत गाड्या असल्याने त्या बंद ठेवण्यात आल्या आहे. धरणगावपर्यंत पॅसेंजर गाड्या सुरू ठेवाव्यात अशी मागणी अनेक प्रवाश्यांची केली होती. कारण पुलाचे काम हे पाळधी ते जळगाव दरम्यान सुरू आहे. पण रेल्वे प्रशासनाने काम सुरू असल्याचे कारण सांगत गाड्या ‘जश्या सुरू आहे तशाच रूट रहाणार‘ असा पवित्रा घेतला आहे. जर पॅसेंजर ह्या धरणगावपर्यंत सुरू ठेवल्या असल्या तर असंख्य रोज ये-जा करणार्‍या प्रवाश्यांचे हाल न होता त्यांना जळगाव, भुसावळ जाणे सोपे झाले असते.