कलबुर्गी : देशाची वाटचाल आधुनिकतेकडे सुरु आहे मात्र आद्यापही अंधश्रद्धा नष्ट झालेली नाही. या युगात काय घडेल हे सांगता येत नाही. कर्नाटकमधील कलबुर्गीमध्ये एक भविष्य सांगणारे गाढव चर्चेत आहे. पन्नालाल असे त्या गाढवाचे नाव आहे. हे गाढव प्रशिक्षीत केलेले आहे.
शक्यतो गाढवाला सर्वजण मूर्ख प्राणी समजतात. पण हे भविष्य सांगणारे गाढव चांगलेच चर्चेत आले आहे. या संदर्भात गाढवाचा मालक खलील याने सांगितले की, मी वर्षानुवर्षे ही शो करत आहे. याला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचेही त्याने सांगितले.
https://www.youtube.com/watch?v=Q119AC5QV10
कोणता मुलगा इंजिनियर, डॉक्टर, वकिल होईल हे गाढव सांगते. तसेच कोणता मुलगा अभ्यासात हुशार आहे, कोण आपल्या आई – वडिलांची सेवा करेन, कोण कंजुष किंवा दिलदार आहे यासंबंधी गाढव सांगत असल्याची माहिती मालक खलिल यांनी दिली. या गाढवाचा शो पाहण्यासाठी २० रुपयाचे तिकिट आकारले जाते. ज्यावेळी शो चालू होतो त्यावेळी सर्वजण सर्कल करून उभे राहतात आणि मध्यभागी गाढव व त्याचा मालक खलील अहमद खान हे असतात. खलील हा या गाढवाला आसपासच्या परिसरात होणाऱ्या यात्रेमध्ये घेऊन जातो. त्याठिकाणी हे त्याचा शो सादर करतात.