गाणी ऐकण्यात गुंग असल्याने ट्रेन खाली येऊन युवकाचा मृत्यू

0

मध्य प्रदेश : इअरफोन लावून मोबाइलवर गाणी ऐकू नका असे विविध माध्यमातून वारंवार आवाहन केले जाते. पण अनेकजण त्याकडे दुर्लक्ष करतात. मध्य प्रदेशात एक ह्दयद्रावक घटना घडली आहे.

कानाला इअर फोन लावून गाणी ऐकण्यात गुंग असलेल्या एका २० वर्षीय युवकाचा ट्रेन खाली येऊन मृत्यू झाला. सुनील यादव असे मृत तरुणाचे नाव असून तो भाडभाडा गावात रहायला होता. बुधवारी सुनील नेहमीप्रमाणे आपल्या गुरांना घेऊन रेल्वे रुळानजीकच्या परिसरात गेला होता. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा सुनीलचा मृतदेह रुळावर पडलेला होता.