भुसावळ- अकोल्याजवळील पारस रेल्वे स्थानकाजवळ गायगाव डेपोतील पेट्रोल चोरी प्रकरणाच्या गुन्ह्यात आरपीएफ उपनिरीक्षक राम नारायण यादव यांना 11 रोजी अटक करण्यात आली होती. रेल्वे न्यायालयाने आरोपी यादव यांना 14 पर्यंत आरपीएफ कोठडी सुनावली होती तर गुरुवारी कोठडीची मुदत संपल्यानंतर आरोपीस पुन्हा न्यायालयात हजर केले असता 15 हजारांच्या जातमुचलक्यावर यादव यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली. तपासाधिकारी तथा आरपीएफ निरीक्षक प्रवीण कसबे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत. दरम्यान, या प्रकरणातील दुसरा संशयीत बी.एस.ढाकणे या कर्मचार्याने वरीष्ठ न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला असलातरी तो पसार असल्याने त्याचा शोध आरपीएफकडून घेतला जात आहे.