गायत्री गोपीचंदला विजेतेपद

0

हैदराबाद । सायना नेहवाल, पी.व्ही. सिंधू या बॅटमिंटनपटूंना घडवणार्या गोपीचंदच्या घरीदेखील आता आनंदाचं वातावरण आहे. पुलेला गोपीचंद यांची मुलगी गायत्री हिने 19 वर्षाखालील वयोगटाची राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा जिंकली आहे. गायत्रीच्या आईने वयाच्या 16 व्या वर्षी राष्ट्रीय विजेतेपद मिळवले होते. मात्र त्यांचा विक्रम मुलीने मोडीत काढत वयाच्या 14 व्या वर्षी 19 वर्षाखालील वयोगटाची स्पर्धा जिंकली आहे.

यापूर्वी गायत्रीने ज्युनिअर गटाची जागतिक बॅटमिंटन स्पर्धा जिंकली आहे. ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा जिंकणारे पुलेला गोपिचंद हे राष्ट्रीय मार्गदर्शक आहे. त्यांनी सायना नेहवाल, पी.व्ही. सिंधू यांसारख्या अनेक खेळाडूंना घडवण्याचे काम केले आहे. त्यामुळे साहजिकच गायत्रीवर अपेक्षाचे ओझे होते. पण यासार्‍यावर मात करत गायत्रीने विजय पटकवला आहे. पंजाब विद्यापीठाच्या कोर्टमध्ये हा अंतिम सामना रंगला होता. या सामन्यात गायत्रीने तिची वरिष्ठ शटलर पूर्वा भावेवर 23-21, 21-18 ने मात केली. गायत्रीचा लहान भाऊ साईविष्णूदेखील बॅडमिंटनपटू आहे. अनेक दुहेरीच्या स्पर्धांमध्ये त्याने विजय मिळवला आहे. गोपिचंद यांचे संपूर्ण कुटुंब बॅटमिंटन खेळामध्येच आहेत.