भुसावळ। जय गणेश ज्येष्ठ नागरिक संघातर्फे आयोजित ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला नुकतीच सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी ज्येष्ठ नागरिक संघाच्या 35 सदस्यांनी सहभाग नोंदवला. गायत्री शक्तीपीठाच्या हॉलमध्ये 11 रोजी पासून पारायणाला सुरूवात झाली आहे.
दगडू महाराज बामणोदकर प्रमुख वाचक आहेत. पारायण सोहळ्याचे चोख नियोजन करण्यात आले आहे. 18 जुलैला प्रवचनाने पारायणाची सांगता होणार आहे. पारायण सोहळ्यासाठी ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व सदस्यांचे सहकार्य लाभत आहे. पारायणाच्या काळात शनिवारी 15 रोजी होणारी ज्येष्ठ नागरिक संघाची सभा रद्द करण्यात आली आहे. शांताराम बोबडे, बापू मांडळकर, गोपाळ वाणी, रमाकांत पाटील, आर.एल.पाटील, दिनकर बेंडाळे, अरूण मांडळकर परिश्रम घेत आहेत. पारायण महोत्सवात सहभागी झालेल्या भाविकांना पुरूषोत्तम मेंडकी यांनी फराळ दिला.