नवी मुंबई । मनपाच्या कला, क्रीडा व सांस्कृतिक विभाग व कलश एन्टरटेन्टमेंट आयोजित सामूहिक गायन स्पर्धेत ऐरोली येथील श्रीमती सुशीलादेवी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांकपटकावून महापौर चषक पटकावण्याचा मान मिळवला. या चषकासाठी 25 शाळांचे विद्यार्थी स्पर्धक होते.
महापालिकेच्या वतीने गेल्या दोन वर्षांपासून मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून महापौर चषकाचे आयोजन केले जाते. विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात असते. याही वर्षी नवी मुंबई परिसरातील हजारो विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते.
श्रीमती सुशीलादेवी देशमुख विद्यार्थ्यांनी देवा श्रीगणेशा हे प्रसिद्ध गीत गाऊन प्रथम पारितोषिक पटकावत उपस्थितांची दाद मिळवली. या सामूहिक गीतामध्ये दीक्षा तळेकर, दीपाली शिर्के, ऐश्वर्या लाड, राज्यश्री मोहिते, अभय भारती, अरिंजय इंगळे, सत्याश घोडे, लक्ष पांडे, मार्टिन सोनार, आदित्य तिवारी, देविका कीर्तने, रजत एतम व प्रथमेश आवडे या 7 व 8 वीच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता.
स्पर्धेत हजारो विद्यार्थी सहभागी
पारितोषिक वितरण समारंभ कला, क्रीडा, सांस्कृतिक सभापती लीलाधर नाईक, अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण, नगरसेविका श्रद्धा गवस, कलश एन्टरटेंनमेंटच्या अंजना गायकवाड यांच्या हस्ते पार पडला. परीक्षक म्हणून फिजा चित्रपट गायक उस्ताद गुलाम कादिर व डान्स इंडिया डान्स फेम पोलसन थॉम्सन यांनी काम पहिले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या या यशाबाबत कौतुक करताना विद्यार्थ्यांनी शाळेचा नावलौकिक वाढवल्याचे सांगितले.