शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने जाहीर केला निर्णय
मुंबई :- राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने गायीचा नवा संशोधित दर शासन निर्णयाद्वारे जाहीर केला आहे. सरकारच्या नव्या आदेशानुसार आता दुध संघांनी शेतक-यांना दुधाच्या गायीसाठी 3.2 फॅट आणि 8.3 एसएनएफ असल्यास 26 रूपये 10 पैसे दर देणे बंधनकारक केले आहे.
सध्या राज्यातील दुध संघांनी शेतकरी दुध उत्पादकांना 3.5 फॅट आणि 8.5 टक्के एसएनएफ साठी प्रतिलिटर 27 रूपयांचा दर द्यावा, असा शासनाचा आदेश होता. मात्र, गायीच्या दुधातील फॅट आणि एसएनएफचे प्रमाण कमी असेल तर दुध संघांकडून शेतक-यांना नाडवले जात होते. शेतक-यांना 20 ते 24 रूपयेच दर दिला जात आहे. त्यामुळे आता सरकारने 27 रूपये प्रतिलिटरच्या तुलनेत हा नवा दर जाहीर केला आहे.
त्यामुळे आता दुधाच्या गायीसाठी 3.2 फॅट आणि 8.3 टक्के एसएनएफ असल्यास 26 रूपये 10 पैसे दर देणे बंधनकारक आहे तर 4.5 फॅट आणि 30 टक्के एसएनएफ असल्यास शेतक-यांना प्रतिलिटर 30 रूपये दर मिळणार आहे. शासनाच्या या निर्णयानंतर दुध उत्पादकांचे आंदोलन कमी होण्याची शक्यता पशुसंवर्धन आणि दुग्धविकास विभागाकडून वर्तवण्यात येत आहे.
हे देखील वाचा