अहमदाबाद । हिंदूसाठी पवित्र असणार्या गायीला राष्ट्रीय पशू घोषित करावे, अशी मागणी अखिल भारतीय इमाम संघटनेचे प्रमुख उमर अहमद इल्यासी यांनी केली आहे. ते बुधवारी गुजरातमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका धार्मिक कार्यक्रमात बोलत होते. इल्यासी यांनी ही मागणी करताच सर्व उपस्थितांनी उभं राहून टाळ्या वाजवत त्यांच्या या भूमिकेचं स्वागत केलं.
गुजरात विद्यापीठाच्या कन्वेन्शन हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या महोत्सवात त्यांनी ही मागणी केली. यावेळी त्यांनी आपलं म्हणणं पटवून देण्यासाठी दिल्लीत घडलेला एक किस्साही सांगितला. दरम्यान, त्यांच्या या मागणीचे स्वागत करण्यात येत असले तरी यामुळे वाददेखील होण्याची शक्यता आहे.