गारखेडा येथे गावठी दारुची हातभट्टी केली उध्वस्त

0

जामनेर। तालुक्यातील गारखेडा येथे आज पोलीसांनी टाकलेल्या धाडीत दहा हजार रुपयाची अवैध दारू बनवण्याचे रसायन नष्ट व गावठी हातभट्टी उध्वस्त करण्यात आली. अज्ञात आरोपींवर जामनेर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गारखेडा शिवारातील वाघूर धरणाच्या बॅक वॉटर येथे हातभट्टी दारू तयार केली जाते होती. तसेच अवैध दारू विक्री केली जात असल्याची माहीती जामनेर पोलीसांना मिळाली होती. पोलिसांनी माहीतीच्या आधारे मंगळवारी याठिकाणी जाऊन छापा टाकला. गावठी हातभट्टीची दारू आणि दारू तयार करण्यासाठी लागणारी साधने, ७ टाक्या असा एकूण दहा हजार रुपये किमतीचा माल नष्ट करण्यात आला. जामनेर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा छापा टाकण्यात आला. यावेळी विलास चव्हाण, हंसराज वाघ, राहुल पाटील, निलेश घुगे, तुषार पाटील यांनी ही कारवाई केली.