गारखेडा येथे चारशे लिटर गावठी दारु साठा जप्त

0

जामनेर । तालूक्यातील गारखेडा येथे जामनेर पोलीसांनी सकाळीच साडे पाच वाजेच्या सुमारास धडक कारवाई केली. यात एका घरातून चारशे लिटर गावठी दारुचा साठा जप्त केला. तसेच जंगल परिसरात असणार्‍या गावठी दारुच्या भट्ट्याही नष्ट केल्या. सोमवारी साजरा केल्या जाणारा बैल पोळ्यानिमित्त विक्रीच्या उद्देशाने दारु साठा लपवून ठेवल्याचा अंदाज पोलीसांना आल्याने त्यांनी धडक कारवाई केली. पोलीस निरीक्षक नजीर शेख यांच्या नेत्वृत्वात पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील, विलास चव्हाण, सुनिल राठोड, हरीशचंद्र पवार, सचिन पोळ, दिनेश मारवडकर, योगेश सुतार, हरिष पोळ यांच्यासह पोलीस कर्मचार्‍यांचा पथकात समावेश होता. उशीरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.