गारगोटवाडी गावाला ‘शरद आदर्श कृषी ग्राम‘ पुरस्कार

0

अजित पवार यांच्या हस्ते ग्रामस्थांचा सन्मान

खेड : शरद आदर्श कृषी ग्राम पुरस्काराने गारगोटवाडी (ता. खेड) गावाला नुकतेच सन्मानित करण्यात आले. सरपंच वर्षा बच्चे, ग्रामसेविका छाया राळे यांच्यासह ग्रामस्थांनी पुरस्कार स्वीकारला. कृषी क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबदल खेड तालुक्यातून गारगोटवाडी गावची निवड करण्यात आल्याने पुणे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्यावतीने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुरस्कार देवून गौरविण्यात आले.

कार्यक्रमाला मान्यवरांची मांदियाळी…

यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्‍वास देवकाते, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज मांढरे, जिल्हा कृषी अधिकारी सुनिल खैरनार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नृसिंह मित्रगोत्री, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती सुजाता पवार आदि मान्यवर उपस्थित होते. शरद आदर्श कृषी ग्राम पुरस्कार स्विकारण्यासाठी ग्रामपंचायत सदस्या नेहा गारगोटे, सुखदेव शिंदे, पार्वताबाई बच्चे, शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे खेड तालुका प्रमुख दत्ताभाऊ कंद, जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष मनोहर बच्चे, विस्तार अधिकारी ए. एन. मुल्ला, बी. डी. ओव्हाळ, बॉश इंडिया फाऊंडेशनचे गणेश कुटे, ऍड. माणिक गारगोटे, अतुल गारगोटे, बाळासाहेब शिंदे, नवनाथ काळोखे, राहुल गारगोटे, दत्ताभाऊ गारगोटे, नामदेव गारगोटे, पांडुरंग गारगोटे, मुरलीधर कंद, रघुनाथ गारगोटे, पाडुरंग काळोखे, दादामिया शेख, सतीश गारगोटे, मंगेश काळोखे, अंकुश बच्चे, सिताराम बच्चे, संतोष कंद, गणेश गारगोटे, दादाभाऊ गारगोटे, बाळासाहेब गारगोटे आदींसह गावातील मान्यवर उपस्थित होते.