पाचोरा : तालुक्यातील गाळण येथील शेतकर्याला विषारी सर्पाने दंश केल्याने शेतकर्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. अरुण मोहन वाडेकर (50, रा.गाळण, ता. पाचोरा) असे मयताचे नाव आहे.
शेतात झाला सर्पदंश
अरुण वाडेकर हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास होते व शेती हेच त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन होते. बुधवार, 26 एप्रिल रोजी दुपारी शेतात किरकोळ कामे करत असतांना त्यांना विषारी सर्पाने दंश केला व ही बाब त्यांचा भाचा प्रवीण उत्तमराव वाघ यांना लक्षात आल्याने त्यांनी तातडीने मामा यांना खाजगी वाहनाने उपचारार्थ हलवले मात्र वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी करून मयत घोषीत केले. डॉक्टरांच्या खबरीवरून पाचोरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास निरीक्षक किसनराव नजन-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विनोद पाटील करीत आहे.