भुसावळ:- गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेचा प्रचार व प्रसार होण्यासाठी प्रशासनाने विविध उपक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे. या योजनेसंदभार्त अधिक जनजागृती करण्यासाठी तहसीलदार विशाल नाईकवाडे यांच्यासह पदाधिकार्यांनी कुर्हे पानाचे येथील लघू पाटबंधारे विभागाने उभारण्यात प्रकल्पाची भेट देऊन पाहणी केली. याप्रसंगी निवासी नायब तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे, कुर्हे तलाठी ज्ञानेश्वर पाटील, पोकलॅण्ड मशीन मालक वरुण इंगळे, सरपंच सुरेश शिंदे, कोतवाल प्रकाश अहिर, शेतकरी भुवन शिंदे, वासुदेव इंगळे, ललित इंगळे, अजय पाटील, रमाकांत पाटील, परशुराम बारी व सुनील धांडे उपस्थित होते.