शासनस्तरावर समन्वय ठेवून प्रश्न सोडविण्याची दिली ग्वाही
सुरेशदादा जैन यांची पत्रकार परिषदेत माहिती
जळगाव । जळगाव मनापाचे 2 हजार 175 गाळेधारक आणि जळगावकर यांचा संयुक्तमोर्चा मंगळवार रोजी आयोजित करण्यात आला होता. या मोर्चास राजकिय पक्षांसह विविध संघटनांनी पाठिंबा जाहिर केला.याची दखल शासनाने घेतली असून पालकमंत्री यांच्या समन्वयातून हा प्रश्न सोडविण्यासाठी 18 सप्टेंबर रोजी बैठक आयोजित करण्यात आली आहे. म्हणून तुर्त हा मोर्चा स्थगित केल्याची माहिती माजी आ.सुरेशदादा जैन यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रविवार रोजी दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा जिल्हाधिकारी निंबाळकरांना फोन आला. त्यात हा मोर्चा स्थगित करावा. सरकार गाळेधारकांचा सहानुभुतीने विचार करत आहे. पुढील सोमवारी त्याबाबत बैठक घेण्यात येत आहे. यामुळे मोर्चा थांबविण्यात यावा त्यात हा मोर्चा स्थगित करावा. पुढील सोमवारी त्याबाबत बैठक घेण्यात येत आहे. यामुळे मोर्चा थांबविण्यात यावा. दादांना वाटत असेल तर पालकमंत्री त्यांच्याशी फोनवर बोलतील असे सांगीतले. यामुळे शासन सहानुभुतीने विचार करत आहे. न्यायालयाचा निर्णय विरोधात आहे. यामुळे आपण शासनालाच विनंती करू शकतो. पालकमंत्री व जिल्हाधिकारी निश्चितच गाळेधारकांना दिलासा देणारा निर्णय घेतीलच याची खात्री असून 40 हजार नागरिकांच्या जीवनाशी संबंधीत या ज्वलंत समस्येचे निराकाण् होऊन गाळेधारक सुटकेचा श्वास घेतील असे सुरेशदादा जैन यांनी सांगीतले.
बैठकीला बोलविल्यास उपस्थित राहणार
18 रोजी होणार्या बैठकिला शासनाने निमंत्रित केल्यास माजी आ. सुरेशदादा जैन, महापौर ललित कोल्हे व माजी महापौर नितीन लढ्ढा हे गाळेधारकांचे प्रतिनिधी म्हणून बैठकित सहभागी होवू शकतात. महापालिकेच्या गाळेधारकांचा प्रश्न निकाली निघावा यासाठी 18 रोजी राज्य शासनाची बैठक होणार आहे. या पत्रपरिषदेला सुरेश आबा पाटील, युवराज वाघ, पंकज कांतीलाल मांयापा, दिलीप दहाड, कल्पेश सोनी, तेजस देपुरा, मदनलाल डाहारा, कमल तलरेजा, अब्दुल मजीद शे.करीम, युसुफ अली ईशाइ अली सैय्यद, सुनील गगडाणी,ऋषी सोळुंके, राजेश पिंगळे,सुजीत किनगे, राजेंद्र देसले, गिरीष थोरात, वसिम काझी, भुषण देपूरा, राजेश समदानी, राजेश शिंपी, राजेंद्र शिंपी हे गाळेधारक उपस्थित होते.