गाळेधारकांची सुरेश जैन यांच्याकडे धाव

0

जळगाव । महापालिका मालकीच्या मुदत संपलेल्या 18 मार्केटपैकी 14 मार्केटमधील सुमारे अडिचशे गाळेधारकांनी माजी आमदार सुरेश जैन यांची भेट घेवून हा तिढा सोडविण्याचे साकडे घातले. यावर कोर्टाचे आदेश असल्याने या हस्तक्षेप करता येणार नाही, मात्र मी तुमच्या सोबत असल्याची ग्वाही जैन यांनी दिली. मंगळवारी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मुक मोर्चा काढण्याची तयारी गाळेधारकांनी सुरु केली आहे.

जळगाव महापालिकेच्या 18 मार्केटमधील सुमारे 2300 गाळेधारकांच्या भाडेकराराच्या मुदती संपल्या आहेत. याबाबत हायकोर्टाने महापालिकेला हे गाळे ताब्यात घेण्याची प्रक्रीया पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहेत. आज बुधवारी या 18 मार्केटपैकी महात्मा फुले, सेन्ट्रल फुले, शास्त्री टावर व वालेचा मार्केट वगळता इतर 14 मार्केटमधील गाळेधारकांनी खान्देश विकास आघाडीचे नेते सुरेश जैन यांच्या निवास्थानी जावून भेट घेतली. यावेळी मनपा गाळेधारक संघटनेचे राजस कोतवाल, तेचस देपुरा, युवराज वाघ यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. तर सुरेश जैन यांच्यासोबत माजी महापौर रमेश जैन, नगरसेवक जितेंद्र मुंदडा आदी उपस्थित होते.