गाळेधारकांना चाव्या वाटप

0

नवापुर-  येथे आज महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त 26 दुकाने (टपरी)धारकांना तो वाटपाचा शुभारंभ कार्यक्रम नवापुर नगरपालिकेने आयोजित केला होता यावेळी आदिवासी सहकारी साखर कारखाना चेअरमन शिरीष नाईक माजी.जि.प अध्यक्ष भरत गावीत नगराध्यक्षा सौ रेणुका गावीत.जि.प सदस्या सौ.संगिता गावीत. यांचा हस्ते गाळेधारकांना चावी देऊन शुभारंभ करण्यात आला.

यावेळी उपनगराध्यक्ष हारुण खाटीक, न.पा गटनेते गिरीष गावीत, विरोधी पक्षनेता नरेंद्र नगराळे, नगरसेवक अजय पाटील, आयुब बलेसरीया, आरीफ पालावाला, आशिष मावची , नगसेविका सौ.मेघा जाधव , प्रा ज्योती जयस्वाल, सुशिला अहिरे, माजी नगरसेवक विनय गावीत, हेमंत जाधव, हरीष पाटील, जैनु गावीत, प्रा नवल पाटील, दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष हेमंत पाटील, उपाध्यक्ष निलेश पाटील, सचिव महेद्र जाधव,सुधीर निकम , न.पा कार्यालय निरीक्षक मिलिंद भामरे, अभियंता सुधिर माळी, राजेंद्र चव्हाण, परशुराम ठाकरे, आरोग्य निरीक्षक भरत गावीत, प्रकल्प अधिकारी प्रशांत भट, राजु गावीत आदी उपस्थित होते. मागील काही महिन्या पुर्वी या 26 गाळयाचा जाहीर लिलाव नवापुर नगरपालिका सभागृह येथे घेण्यात आला होता मात्र आज 14 एप्रिल महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती निमित गाळेधारकांना चाव्या देऊन शुभारंभ करण्यात आला या कार्यक्रमाचे सुञसंचलन राजेंद्र चव्हाण यांनी केले.चौपाटीचा धरतीवर काँलेज रोडवर खाद्य पदार्थ विक्री साठी आता खुले करण्यात आले असुन आता या भागात खवैयेची गर्दी पाहायला मिळणार आहे.