गाळेधारकांना न्यायालयाचा दणका

0

26 आक्टोबरपर्यंत थकीत रकमेपैकी 75 टक्के रक्कम भरण्याचे आदेश

जळगाव-मनपा प्रशासनाने गाळेधारकांना बजावलेल्या कलम 81 ’क’च्या नोटीस आणि कारवाईला स्थगिती द्यावी यासाठी महात्मा फुले व्यापारी संकुलातील गाळेधारकांनी जिल्हा न्यायालयात अपिल दाखल केले होते. या प्रकरणी बुधवारी मनपा प्रशासनाच्यावतीने प्रतिज्ञापत्र दाखल केल्यानंतर गुरुवारी न्या.जी.ए.सानप यांच्यासमोर सुनावणी झाली.यावेळी दोन्ही पक्षकारांची बाजू ऐकूण घेतली.दरम्यान, गाळेधारकांना 26 आक्टोबरपर्यंत थकीत रकमेपैकी 75 टक्के रक्कम भरण्याचे आदेश देवून न्यायालयाने गाळेधारक ांना दणका दिला.

मनपा मालकीच्या मुदत संपलेल्या 18 व्यापारी संकुलातील 2387 गाळेधारकांना थकीत रक्कम भरण्यासाठी प्रशासनाने 81 ‘क’ची नोटीस बजावून 11 ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली होती.मुदतीत थकीत रक्कम न भरल्यास कारवाई करण्याचा इशारा देखील प्रशासनाने दिला होता.दि.14 रोजी उपायुक्त उत्कर्ष गुट्टे यांच्या पथकाने फुले मार्केटमध्ये क ारवाई करुन पाच गाळे सील केले.मात्र कारवाईच्यावेळी अधिकारी आणि गाळेधारकांमध्ये वाद झाला होता. त्यामुळे उपायुक्तांनी वाद घालणार्‍या संबंधित गाळेधारकाविरुध्द गुन्हा दाखल केला केला होता.दरम्यान,मनपा प्रशासनाच्या कारवाईला स्थगिती मिळावी यासाठी फुले मार्केटमधील शितलदास जवहराणी,आनंद नाथाणी,कांतीलाल डेडीया,सुभाष सराफ,वासुदेव गेही या पाच गाळेधारकांनी जिल्हा न्यायालयात धाव घेवून अपिल दाखल केले होते. याप्रकरणी गुरुवारी कामकाज झाले. मनपाच्यावतीने जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड.केतन ढाके यांनी तर गाळेधारकांच्यावतीने अ‍ॅड.के.बी.वर्मा यांनी बाजू मांडली.

असा आहे आदेश
मनपा प्रशासनाच्या कारवाईला स्थगिती मिळावी यासाठी दाखल असलेल्या अपीलवर कामकाज झाले.दरम्यान, न्यायालयाने गाळेधारकांना 26 आक्टोबरपर्यंत थकीत रक मेपैकी 75 टक्के रक्कम भरण्याचे आदेश दिले.तसेच थकीत रक्कम भरणे बंधनकारक असल्याचेही सांगितले. याप्रकरणी पुढील कामकाज दि.8 नोव्हेंबर रोजी कामकाज होणार आहे.

अपील दाखल करणार्‍या पाच गाळेधारकांवर अशी आहे थकबाकी
शितलदास जवहराणी- 59 लाख 15 हजार 926,आनंद नाथाणी- 47 लाख 53 हजार 368, कांतीलाल डेडीया- 65 लाख 2 हजार 32,सुभाष सराफ- 15 लाख 91 हजार 967,वासुदेव गेही-18 लाख 56 हजार 120 रुपये थकबाकी असल्याचे सरकारी वकील अ‍ॅड.केतन ढाके यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.त्यामुळे न्यायालयाने थकीत रकमेपैकी 75 टक्के रक्कम दोन दिवसात भरण्याचे आदेश दिले.

न्यायालयाने मनपालाही न्यायालयाने फटकारले
सन 2012 पासून गाळ्यांची मुदत संपुष्टात आली आहे तर तेव्हाच का? कारवाई केली नाही.काही गाळेधारकांच्या अपिलवर निकाल लागल्यानंतर कारवाई केली असती तर गाळेधारकांवर एवढी थकबाकी झालीच नसती. तुमच्यामुळे लोकांना सुविधा मिळत नाही अशा शब्दात न्यायालयाने मनपा प्रशासनाला फटकारले.