जळगाव-मनपा मालकीच्या मुदत संपलेल्या व्यापारी संकुलातील गाळेधारकांना प्रशासनाने 81 ’क’ ची नोटीस बजावली होती,परंतु फुले व्यापारी संकुलातील गाळेधारकांनी नोटीस स्वीकारण्यास नकार दिला.त्यामुळे आता पोस्टाद्वारे नोटीस बदावण्यात येणार आहे.त्यासाठी प्रशासनाने तयारी सुरु केली आहे.नोटीसनंतर हरकतीवर म्हणने मांडण्यासाठी 15 दिवसाची मुदत दिली जाणार आहे.
महापालिका मालकीच्या मुदत संपलेल्या 18 व्यापारी संकुलांतील 2387 गाळेधारकांना थकीत भाडे भरण्यासाठी दहा दिवसाचा अल्टीमेटम दिला होता. मात्र गाळेधारकांनी थकीत रक्कम न भरल्याने फुले व्यापारी संकुलातील 900 गाळेधारकांना 81 ‘क’ची नोटीस बजावली होती. मात्र गाळेधारकांनी नोटीस स्वीकारल्या त्यामुळे आता पोस्टाद्वारे नोटीस बजावण्यात येणार असून प्रशासनाने हालचाली सुरु केल्या आहेत.
घसारा रक्कम कमी होणार
मनपा मालकीच्या 18 व्यापारी संकुलातील गाळे कराराची मुदत 2012 मध्ये संपुष्टात आली आहे. प्रशासनाने गाळेधारकांना यापूर्वी बिलं बजावली आहेत. परंतु आकारण्यात आलेली रक्कम अवाजवी असल्याचा आरोप करत गाळेधारकांनी हरकत घेतली.दरम्यान, गाळ्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी घसारा रक्कम कमी करण्यात येणार असल्याची हालचाल सुरु आहे.