जळगाव। अस्वच्छ गोलाणी मार्केट व परिसर महानगर पालिकेच्या कर्मचार्यांनी सोमवारी पूर्ण दिवस काम करून स्वच्छ केले. या स्वच्छतेनंतर जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांनी मंगळवारी दुपारी 3 वाजता भेट दिली. या भेटीदरम्यान श्री. निंबाळकर यांनी महानगर पालिकेच्या अधिकारी व कर्मचार्यांचे अभिनंदन करीत तळमजल्यापासून स्वच्छतेची पहाणीस सुरूवात केली. यावेळी त्यांनी दुकानासमोरील कचरा आढळल्यास संबंधीत गाळेधारकास जबाबदार असल्याचे स्पष्ट केले. दुकानदारांनी परिसर स्वच्छ ठेवण्यास सांगून अन्यथा दंड आकरण्याचत येईल असे स्पष्ट केले. दरम्यान, रस्त्यात पडलेले कचरा स्वतः उचलून कचरा पेटीत टाकला.
सीसीटीव्हीद्वारे ठेवणार लक्ष
येत्या दोन दिवसात मार्केटमध्ये येणार्या गेटजवळ सुरक्षारक्षक व सीसीटीव्ही बसविण्यात येणार असल्याचे सांगितले, मार्केटच्या गच्चीप्रवेश बंद करण्याचे आदेश श्री. निंबाळकर यांनी दिलेत. मार्केटमधील खाली गाळे, हॉल, रहिवास घरांना कुलूप गोलाणी मार्केटच्या 1090 गाळ्यापैकी 29 गाळे खाली आहेत त्यांना स्वच्छ करुन दरवाजे बसवून कुलूप लावा, 4 हॉल खाली आहेत त्यांची रंगरंगोटी, दुरुस्ती करुन भाड्याने द्या असे आदेशीत केले. 3 रहिवास घरे खाली आहेत ते शासनदरात राहायला द्या़
या पाहणीत सर्व गाळ्यांची माहिती घेतली. यानंतर मार्केटमधील विनापरवाना दुकानदारांची यादी करण्याची सूचना केली. मार्केट बाहेर लोंबळकलेल्या वायरिंगची फिटींग करण्याचे आदेश दिलेत. प्रत्येक गाळेधारकाच्या गाळ्यासमोर महावितरणच्या वतीने गाळ्यासमोर मिटरची व्यवस्था करण्याचे सांगितले. मार्केटच्या प्रत्येक मजल्यावर असलेले मिटररूम बंद करण्याचे आदेश दिलेत. गाळेधारकांना पिण्याचे पाण्याची व्यवस्था करण्याची सूचना श्री निंबाळकर यांनी दिल्यात. मार्केटमधील शौचालयांची दुरावस्था झाल्याची या पहाणीत त्यांना आढळून आले. मार्केटमधील सर्व शौचांलये अग्निशमनच्या मदतीने प्रेशर देऊन स्वच्छ करा असे सांगितले. तसेच फायर ऑडीट करून इस्टीमेट काढण्याच्या सूचना अग्निशमन अधिक्षक वसंत कोळी यांना दिल्यात.
प्रत्येक गाळेधारकाकडे कचराकुंडी
प्रत्येक गाळेधारकाकडे आपली स्वत:ची कचराकुंडी असलीच पाहीजे. आपल्या परिसरातील कचरा उचलणे त्याचे काम आहे. तसे नसल्यास दंड आकारण्यात येईल. शासकिय कार्यालयांचे प्रॉपर्टी टॅक्स जमा आहे की नाही ते पहाण्याची सूचना केली. जर जमा नसल्यास जमा करण्याचे आदेश दिलेत. सर्व दुकानांना लावलेले बोर्ड काढा, दुकानांचे नाव पेंटने मार्केटमधील सर्व दुकानांसमोरी किंवा परिसरातील लावलेले बोर्ड काढून आपल्या दुकानांचे बोर्ड पेंटने टाकलेले असावे अशा सुचना देण्यात आले़
तीघांकडून दंड वसूल
मार्केटमधील सोन्याच्या दागिणे घडविणारे माणकलाल पन्नालाल वर्मा यांच्यावर केमीकलचा वापरामुळे दोन हजाराचा, कॉम्प्युटर हॉऊस या दुकानासमोर कचरा असल्याने 500 रुपयाचा, तर अग्निशमन बंबाच्या मागिल बाजूस लघूशंका करणार्यांवर 100 रुपयाचा दंड करण्यात आला़ बाकी गाळेधारकांना आपल्या परिसरात कचरा आढळल्यास यापुढे दंड आकारण्यात येण्यार असल्याच्या सुचना देण्यात आल्या. काही गाळेधारकांनी मनपाची परवानगी न घेता अंतर्गत गाळ्याच्या तोडफोड केली आहे, अशा विना परवानगी अंतर्गत दुरुस्ती, तोडफोड करणार्यांची यादी तयार करुन कारवाई करण्यास सांगितले. प्रत्येक गाळ्याचे मजल्यानुसार गाळा नंबर, गाळे धारकाचे नाव, मुळ मालक, पोट भाडेकरु, टॅक्स बाकी असल्यास किती अशी यादी तयार करण्यास सांगितले़