गाळेधारकांवर कारवाईचा मार्ग मोकळा

0

जळगाव । पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गाळे प्रकरणी न्यायालयाचा अवमान न होता कारवाईचे आदेश दिल्याने आता याबाबत कारवाईचा मार्ग मोकळा झाल्याचे संकेत मिळाले आहेत.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी अजिंठा विश्रामगृह येथे विविध विभागांचा आढावा घेतला. त्यानंतर पालिका आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी पालकमंत्र्यांची भेट घेतली. या वेळी आयुक्तांनी गाळेप्रकरणाविषयी विचारणा केली. गाळेधारकांना पैसे भरण्यासाठी पंधरा दिवसांचा कालावधी दिल्याची माहिती दिली. त्यावर गाळेधारकांनी पैसे भरायलाच पाहिजेत. काहीही पैसे भरणार नाही असे म्हणून कसे चालेले असे मत पालकमंत्र्यांनी व्यक्त केले. न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होणार नाही याची काळजी घेत काम करा असे निर्देश त्यांनी आयुक्त डांगे यांना दिले. पालकमंत्र्यांनी दिलेल्या या निर्देशामुळे पालिका प्रशासनाला थेट कारवाई करता येणार आहे.