गाळेधारकांवर कारवाईची टांगती तलवार

0

प्रशासनाच्या नोटीसनंतर 50 गाळेधारकांच्या हरकती,दोन दिवसात कारवाई

जळगाव- मनपा मालकीच्या मुदत संपलेल्या व्यापारी संकुलातील महात्मा फुले सेंट्रल फुले मार्केटमधील गाळेधारकांना 81 क नुसार नोटीस बजावून 15 दिवसात थकीत रक्क म भरण्यासाठी मुदत दिली होती.दिलेली मुदत संपली असल्याने येत्या दोन दिवसात कारवाई करण्याची शक्यता आहे. त्यासाठी प्रशासनाची तयारी पुर्ण झाली आहे.दरम्यान, 50 गाळेधारकांच्या हरकती प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत.

महापालिकेच्या मुदत संपलेल्या 18 व्यापारी संकुलातील 2387 गाळेधारकांच्या गाळ्यांची मुदत 2012 मध्ये संपुष्टात आली. गाळे ताब्यात घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले असून, प्रशासकीय पातळीवर गाळे ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यात गाळेकारवाई केल्यानंतरचा अहवाल शासनाला पाठविण्याचे पत्र शासनाकडून महापालिके ला मंगळवारी मिळाले आहे. तसेच सेंट्रल फुले मार्केटमधील 950 गाळेधारकांना 81 क’ची नुकसान भरपाईची नोटीस बजावली होती. मात्र, 900 गाळेधारकांनी या नोटीस स्वीकारल्या नाहीत. त्यामुळे नोटिसा पोस्टाने महापालिका प्रशानसाने पाठविल्या होत्या.

कारवाईसाठी पोलीस बंदोबस्त
गाळेधारकांना दिलेल्या मुदतीनंतर गाळे ताब्यात घेण्याचा इशारा आयुक्तांनी दिला होता. त्यानुसार सर्व गाळेधारकांची नोटीसीची मुदत संपल्याने दोन-तीन दिवसात गाळेक ारवाई केली जाणार असून त्यासाठी प्रशासानाने सर्व तयारी केली आहे. त्यासाठी पोलिस बंदोबस्त मागविला आहे.

आचारसंहितेच्या काळातही कारवाई शक्य
गाळेकारवाई प्रसंगी राजकीय दबाव प्रशासनावर येण्याची दाट शक्यता आहे. आचारसंहितेत राजकीय दबाब येणार नाही.किंवा कोणीही राजकीय दबाब टाकू शकणार नाही. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली तरीही कारवाई करता येणे शक्य होणार आहे.