जळगाव: महापालिकेच्या मुदत संपलेले फुले व सेंट्रल फुले मार्केटमधील गाळे सील करण्यासाठी आज सोमवारी महापालिकेच्या पथकाने कारवाई सुरु केली. दोन गाळे सील केल्यानंतर महापालिकेचे उपायुक्त उत्कर्ष गुट्टे यांना गाळेधारकांनी घेराव घालून दुकानात लाईट बंद करून त्यांना गळ्यात कोंडण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येत आहे. यावरून वातावरण चीघळल्याने उपायुक्तांनी थेट पोलीस स्टेशन गाठले. त्यांनी गाळेधारकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.
दुसरीकडे गाळेधारकांनी दुकाने बंद करून महापालिका प्रशासन विरोधात घोषणाबाजी केल्या. दरम्यान याठिकाणी राष्ट्रवादीचे जळगाव शहर विधानसभेचे उमेदवार अभिजित पाटील हे पोहोचले, त्यांनी गाळेधारकांशी चर्चा केली.