गावठाण व झोपडपट्टी भागातील मालमत्ता हस्तातारण सुरु करण्याची मागणी

0

नवी मुंबई : मनपाच्या हद्दीमधील गावठाण व झोपडपट्टी विभागातील गेल्या एका वर्षापासून बंद असलेली मालमत्ता कर हस्तातरण प्रक्रिया सुरु करावी, अशी मागणी भाजप नवी मुंबई युवा मोर्च्यांचे उप अध्यक्ष रामदीप हलवाई यांनी केली आहे. हि प्रक्रिया बंद असल्या मूळे गेल्या वर्षा भरात कोट्यवधी रुपायांचा महसूल बुडाला असल्याचेही त्यांनी सांगितले.

जून 2016 मध्ये आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांनी कार्यभार हाती घेतल्या नंतर त्यांनी अनेक निर्णय घेतले होते,त्यापैकीच मालमत्ता कर हासतातरंन प्रक्रिया बंद केली गेली होती,त्यामुळे झोपडपट्टी व गावठाण विभागात अनेक घरे खरेदी व विक्रीच्या चक्रव्युव्हात अडकलेली आहेत, त्यामुळे नागरिकांच्या मनात कमालीचे नैरस्य पसरले आहे.

घर खरेदी किंवा विक्री केल्या नंतर मनपाच्या कार्यालयात जाऊन घर हासतातरंन प्रक्रिया सुरु होते,हि प्रक्रिया सुरु केल्या नंतर हस्तातरंण शुल्का बरोबरच मागील काही कराची बाकी हक्कम असेल तर भरावी लागते,तसेच पाणी बिल बाकी असेल तर ते सुद्धा मालमत्ता कर हस्तातरण करताना भरणे गरजेचे आहे,ह्या सर्व बाबी पूर्ण करत असताना मनपाला दार आर्थिक वर्षयात कोट्यवधी रुपये आपसूकच मिळत असतात,परंतु ही प्रक्रियाच गेल्या वर्षया पासून बंद केल्याने मनपाचे कोट्यवधी रुपये पाण्यात गेले असल्याचे उप अध्यक्ष हलवाई यांचे म्हणणे आहे.

गावठाण व झोपडपट्टी विभागात असलेल्या घरांपैकी अनेक घरेही अनधिकृत आहेत,त्यामुळे तत्कालीन आयुक्त मुंढे यांनी मालमत्ता हस्ततारन प्रक्रिया बॅन करण्याचे आदेश दिले गेले होते असे पालिका सूत्राणी सांगितले,परंतु मालमत्ता हस्तातरंन प्रक्रिया पूर्ण झाले की मिळालेल्या आदेशावर अनधिकृत बांधकाम असे स्पस्ट लिहिलेले असते. त्यामळे दुसरा कोणतीही कायदेशीर प्रक्रिया आड येत नसताना बंद करण्याचे कारन्याच कारण काय असाही सवाल उपाध्यक्ष हलवाई यांनी विचारले आहे. तसेच झोपडपट्टी व गावठाण विभागात राहणारे नागरिक मनपाच्या सोयी सुविधांचा वापर करत असताना त्यांच्या कडून कर रूपाने आलेला पैसे घेण्यास काय हरकत आहे असेही हलवाई यांनी आपले म्हणणे व्यक्त केले आहे.

याच विभागात काही घरे 1995 पूर्वीची आहेत,शासन नियम प्रमाणे ती घरे अनधिकृत असतानाही त्यांचीही घरे खरेदी विक्री केल्यानंतर हस्तातरण होत नाही हे योग्य नसल्याचे हलवाई आपले म्हणणे व्यक्त केले आहे,हि प्रक्रिया बंद केल्यामुळे मनपाचे मात्र कोट्यवधी रुपायांचा नुकसान झाले असल्याचे त्यांनी आपले म्हणणे व्यक्त केले आहे. या बाबत मालमत्ता कर विभागाचे उपायुक्त उमेश वाघ यांच्याशी संपर्क साधला असता. झोपडपट्टी व गावठाण विभागातील मालमत्ता हस्तातरंन प्रक्रिया संबंधी आयुक्तांचा आदेश प्राप्त होताच सुरु होईल असे सांगितले,