धुळे । जिल्ह्यातून मालेगावकडे येणार्या पांढर्या रंगाच्या कारमध्ये बसून एक इसम गावठी कट्टा विकण्यासाठी जात आहे, अशी माहिती मिळाल्यानंतर धुळ्याकडून मालेगावकडे जाणार्या रस्त्यावर चिखल ओहळ शिवारात पोलिसांनी सापळा रचला. पांढर्या रंगाच्या इंडीका कारचा पाठलाग करुन ती कारगिल ढाबा येथे अडविली. गाडीमधील एजाज निजामोद्दीन काझी (वय 32) रा. काझी मोहल्ला, पारोळा ह. मु. चितोड (ता. धुळे) याला ताब्यात घेतले.
एक साथीदार झाला फरार
त्यावेळी त्याचा साथीदार विजय अशोक नकवाल रा. धुळे हा फरार झाला. काझीची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे देशी बनावटीचा गावठी कट्टा, 4 जिवंत काडतूसे असा 1 लाख 20 हजाराचे हत्यारे आढळून आले. एजाज काझीला मालेगाव तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे तर फरार आरोपी विजय नकवाल याच्या शोधासाठी धुळ्यात पथक रवाना झाले आहे. पीआय नवले, एपीआय मालचे, पीएसआय सुनिल अहिरे, हेकॉ सुहास छत्रे, वसंत महाले, राजू मोरे, राकेश उबाळे, देवा गोविंद, फिरोज पठाण, रतीलाल वाघ यांनी ही कारवाई केली.