गावठी कट्टा बाळगणार्‍याला अटक

0

तळेघर । बेकायदा गावठी कट्टा बाळगल्याप्रकरणी गंगापूर बुद्रुक येथील एका व्यक्तीला घोडेगाव पोलिसांनी अटक केली आहे. गोविंद विठ्ठल मधे (वय 24) असे त्याचे नाव आहे. त्याने विक्रीकरीता गावठी कट्टा जवळ बाळगला होता. गुरुवारी (दि. 14) सापळा लावून गंगापूर गावच्या हद्दीत आमोंडी रोडवर त्याला या गावठी कट्ट्यासह पकडले. त्याच्याकडून दोन जीवंत काडतुसे देखील मिळाली. मधे याचा मित्र लोकेश मुदपूर हा मध्यप्रदेश येथील राहणारा असून त्याने तेथून 25 हजार रुपयांना गावठी लोखंडी कट्टा विकत आणला होता. तो हा कट्टा विक्री करणार असल्याची खबर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तात्काळ गोविंदला ताब्यात घेतले. पुढील तपास पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे करीत आहेत.