भुसावळ। शहरातील वाल्मिक नगरात एका संशयीताकडे गावठी कट्टा असल्याची गुप्त माहिती बाजारपेठ पोलिसांच्या डीबी पथकाला मिळाल्यानंतर सापळा रचून आरोपीस पकडण्यात आले. आरोपीच्या ताब्यातून गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे. आकाश रायसिंग पंडीत (वय 26, वाल्मिक नगर, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपीविरुध्द यापूर्वीदेखील काही गुन्हे दाखल असल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत आरोपीची चौकशी सुरु होती.
यांचा कारवाईत सहभाग
सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल व पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबीचे निशीकांत जोशी, दीपक जाधव, सुनील सैंदाणे, श्रीकृष्ण देशमुख, सुनील थोरात, नीलेश बाविस्कर, राहुल चौधरी, प्रशांत चव्हाण, युवराज नागरुत आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कट्टा सापडला मात्र मॅगझिन गायब
अटकेतील आरोपी आकाश रायसिंग पंडीत याने एकावर गावठी कट्टा रोखल्यानंतर याबाबतची गोपनीय माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळाल्यानंतर आरोपीचा शुक्रवारी शोध घेण्यात आला. आरोपीने कट्टा लपवून ठेवल्यानंतर पोलीस चौकशीत तो काढून दिला. या कट्ट्यात मात्र मॅगझिन नसल्याचे उघड झाले आहे. पोलिसांकडून मॅगझिनचा कसून शोध घेतला जात आहे.