गावठी कट्टा बाळगला ; भुसावळात एकास अटक

0

कुविख्यात गोजोर्‍या बाजारपेठ पोलिसांच्या जाळ्यात

भुसावळ- शहरातील आठवडे बाजार भागातील टीव्ही टॉवर परीसरात कंबरेला गावठी कट्टा लावून दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने फिरणारा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार किशोर ऊर्फ (गोजोर्‍या) सकरु जाधव (25, वाल्मीक नगर, जामनेर रोड, भुसावळ) यास अटक करण्यात आली. आरोपीच्या ताब्यातून 12 हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा जप्त करण्याची कारवाई रविवारी सायंकाळी बाजारपेठ पोलिसांच्या अवैधफ.शस्त्र जप्त पथकाच्या कर्मचार्‍यांनी केली.

यांनी केली कारवाई
सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली अवैधशस्त्र जप्त पथकातील उपनिरीक्षक युवराज अहिरे, सुनील सैंदाणे, सुनील थोरात, कृष्णा देशमुख, निलेश बाविस्कर, दीपक जाधव आदींना मिळालेल्या माहितीनुसार ही गुप्त कारवाई करण्यात आली. आरोपीविरुद्ध रात्री उशिरा बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपापस हवालदार जयराम खोडपे करीत आहेत.