गावठी कट्टा बाळगल्या प्रकरणी एकास अटक

0

भुसावळ। शहरातील बालाजी लॉन वांजोळा रोड येथे एक व्यक्ती गावठी कट्टा बाळगून असल्याची गुप्त माहीती मिळाल्याने बाजारपेठ पोलीस स्थानकाच्या पथकाने बुधवार 19 रोजी पहाटे 4 वाजेच्या सुमारास अटक केली आहे.

बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या पथकाची कामगिरी
जामनेर रोड लगत दिनदयाल नगर भागातील रहिवासी तुषार उर्फ (भैया) दशरथ फालक (वय 33) याच्याकडे गावठी कट्टा असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. या माहितीवरुन पोलीस उपअधीक्षक निलोत्पल, बाजारपेठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी पोलिस हेड कॉन्स्टेबल निशिकांत जोशी, पोलीस नायक बंटी सैंदाणे, पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा देशमुख, निलेश बाविस्कर, दिपक जाधव, प्रशांत चव्हाण, राहुल चौधरी, उमाकांत पाटील यांनी लागलीच तेथे जावुन सापळा रचुन त्यास ताब्यात घेतले व त्यास पोलीस स्थानकात आणुन त्याची कसुन चौकशी केली. याबाबत बाजारपेठ पोलीस स्थानकात तुषार फालक विरुध्द गुन्हा दाखल केला असुन त्या गुन्ह्याचा तपास हेड कॉन्स्टेबल निशिकांत जोशी करीत आहे. दरम्यान शहरात अशाप्रकारे अवैधरित्या गावठी पिस्तुल आढळल्याच्या घटना वारवार घडत आहे. शहरातील वाढती गुन्हेगारी व गोळीबाराच्या घटना लक्षात घेता पोलीस प्रशासनाने गावठी पिस्तुलींची तस्करी रोखण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.