तळेगाव दाभाडे : गावठी कट्टा बेकायदेशीरपणे बाळगल्या प्रकरणी तळेगाव पोलिसांनी एकाला अटक केली. ही कारवाई मंगळवारी (दि. 30) सायंकाळी सहाच्या सुमारास सोमाटणे फाटा येथे करण्यात आली. विशाल उर्फ गोट्या नथु चव्हाण (वय 23, रा. सोमाटणे फाटा, तळेगाव दाभाडे, ता. मावळ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक तरुण सोमाटणे फाटा येथे संशयितरित्या थांबला असल्याची माहिती तळेगाव पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून विशाल याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ एक गावठी बनावटीचा कट्टा आढळून आला. त्यासोबत एक जिवंत काडतुस मिळाले. पोलिसांनी एकूण 5 हजार 500 रुपयांचा ऐवज जप्त केला. पोलिसांनी आरोपी विरोधात भारतीय हत्यार कायदा कलम 3 (25) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.