गावठी कट्टा विक्रीचा डाव उधळला ; मध्यप्रदेशातील दोघांना भडगावात अटक

0

भडगाव- एरंडोल रस्त्यावरील चिकूच्या मळ्याजवळ काही जण गावठी कट्टा विकण्यासाठी येणार असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी मध्यप्रदेशातील दोघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. शिवराम झांझल्या बारेला (21), व सायसिंग वेचान बारेला (20, दोन्ही रा. गेरूघाती, ता.वरला, जि.बडवाणी, मध्यप्रदेश) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरोपींच्या ताब्यातून गावठी कट्टा, मोबाईल व दुचाकी जप्त करण्यात आली. तपास निरीक्षक धनंजय येरूळे करीत आहेत.

यांनी केली कारवाई
ही कारवाई निरीक्षक धनंजय येरूळे यांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्र साळुंखे, लक्ष्मण पाटील, नितीन राऊत, दीपक सुरवाडे, योगेश पाटील, सचिन चौधरी, गणेश कुमावत, ईश्‍वर पाटील, नितीन रावते यांच्या पथकाने केली.