गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह आरोपी धुळे गुन्हे शाखेच्या जाळ्यात

धुळे : धुळे स्थानिक गुन्हे शाखेने गावठी कट्टा बाळगणार्‍या संशयीतास अटक केली आहे. रीतीक उर्फ निक्की अमरसिंग पंजाबी (22) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. संशयीताकडे गावठी कट्टा असल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाल्यानंतर त्यांनी कारवाई आदेश दिल्यानंतर संशयीताच्या दंडेवालाबाबा नगर भागातून मुसक्या आवळण्यात आल्या तर दंडेवालाबाबा नगरातील हुडको कॉलनी शेजारील नाल्यालगत असलेल्या श्री कृष्णा पार्कीग यार्डचे कंपाऊंड वॉलच्या शेजारील दगडाखाली लपवून ठेवलेला 25 हजार रुपये किंमतीची गावठा कट्टा व एक जिवंत कट्टा आरोपीने काढून दिला.

संशयीताविरोधात पाच गुन्हे दाखल
शहरातील देवपूर व मोहाडी उपनगरात प्रत्येकी दोन तर आझादनगर पोलिस ठाण्यात आरोपी विरोधात प्रत्येकी एक गुन्हा दाखल आहे. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, एपीआय प्रकाश पाटील, बाळासाहेब सूर्यवंशी, योगेश राऊत, प्रकाश सोनार, संदीप सोनार, पोना सागर शिर्के, पंकज खैरमोडे यांच्या पथकाने केली.