भुसावळ। तालुक्यातील कन्हाळा येथे सुरु असलेल्या 4 गावठी दारु हातभट्टयांवर तालुका पोलिस स्थानकाच्या पथकाने कारवाई करुन 25 हजारांची दारु जप्त करुन नष्ट केली. रविवार 2 रोजी पहाटेच्या सुमारास पोलीसांनी हि धडक कारवाई केली. यातील चारही आरोपी घटनास्थळावरुन पसार झाले असून परिसरातील अवैध धंदेवाईकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी निलोत्पल यांन अवैध धंद्यांवर आळा घालण्यासाठी शहर व परिसरात कारवाईचे सत्र सुरु केले असून दोन दिवसांपूर्वी शहरातही तीन ठिकाणी धाड टाकून कारवाई करण्यात आली होती. कन्हाळा गावात मोठ्या प्रामणात गावठी हातभट्टया सुरु असल्याची माहिती तालुका पोलिसांना मिळाल्यानुसार. 1 रोजी पहाटेच्या सुमारास चार भट्यांवर कारवाई केली. यात सुभाष तुकडू गवळी (रा.कन्हाळा) गावाजवळील पाण्याच्या बंधार्याजवळील भट्टीवर पहाटे 5.40 वाजता छापा मारुन 1 हजार 750 रुपयांची 25 लिटर तयार दारु, 6 हजार रुपयांचे 600 लिटर रसायन अशी 7 हजार 750 रुपयांची दारु जप्त करुन जागीच नष्ठ करण्यात आली.
या ठिकाणी करण्यात आली कारवाई
बुद्धू इमाम गवळी याच्या घराजवळील नाल्याजवळील भट्टीवरुन 1 हजार 400 रुपयांची 20 लिटर दारु, 4 हजार रुपयांचे 400 लिटर रसायन अशी 5 हजार 400 रुपयांची दारु जप्त करुन नष्ठ करण्याची कारवाई सकाळी 6.10 वाजता करण्यात आली. युसुफ इमाम गवळी याच्या घरामागील दारु भट्टीतून 1 हजार 400 रुपयांची 20 लिटर दारु, व 4 हजार रुपयांचे 400 लिटरचे रसायन अशी 5 हजार 400 रुपयांची दारु नष्ठ करण्याची कारवाई सकाळी 6.25 वाजता करण्यात आली. गफूर बुद्धू गवळी याच्या गवळी वाडा येथील घराच्या मागच्या बाजूस नाल्याजवळील भट्टीत 2 हजार 800 रुपयांची 40 लिटर दारु व 6 हजार रुपयांचे 600 लिटर रसायन असा माल नष्ठ करण्याची कारवाई सकाळी 7.20 वाजता करण्यात आली.
यांच्या पथकाने केली कारवाई
ही कारवाई सहाय्यक पोलिस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलिस स्टेशनचे परिवीक्षाधिन सहाय्यक पोलिस अधीक्षक मनीष कलवाणीया, पोलिस निरीक्षक बाळासाहेब गायधनी, पोलिस उपनिरीक्षक सचिन खामगड यांसह पीएसआय शशीकांत चौधरी, पोलिस नाईक रियाज शेख, हवालदार युनुस शेख, अजय माळी व सुनील पाटील यांनी मुंबई पोलिस प्रोव्हिशन ऍक्ट प्रमाणे चार आरोंपींवर करवाई करुन गुन्हा नोंदविण्यात आला आहे. करवाई दरम्यान चारही आरोपी घटनास्थळावरुन पसार झाले आहे. तालुक्यात अजूनही बर्याच ठिकाणी अशा प्रकारे गावठी दारुचे अड्डे सर्रासपणे सुुरु असून डिवायएसपी निलोत्पल यांनी व्यापक स्वरुपात कारवाई राबवून इतरही ठिकाणचे धंदे बंद करण्याची आवश्यकता आहे.