गावठी दारु अड्यावर छापा

0

पिंपळनेर । येथील पोलीसानी टेंभा-मोखळपाडा येथे अवैध गावठी दारू अड्यावर छापा टाकून १४ हजार रूपये किमतीची दारू उद्ध्वस्त केली. यात दारू बनविण्याचे साहित्य ही नष्ट करण्यात आले. धडक मोहीमेत सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील भाबड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक लोकेश पवार, पोलीस शिपाई ललित पाटील, विशाल मोहने, सुनील साळुंखे, पंकज वाघ आदींनी ही कारवाई केली. संशयित निंबा झिपरू वळवी रा.मोखळपाडा याला ताब्यात घेत त्याचेवर कायदेशीर कारवाई केली.