साक्री । घोडदे गावाच्या बस स्टँडजवळ मोटर सायकलवरून प्लॅस्टीकच्या कॅरीबॅगमध्ये गावठी हात भट्टींची दारू घेवून जाणार्या दोघांना शनिवारी दुपारी 2 वाजून 50 मिनीटांनी साक्री पोलीसांनी अटक केली आहे. अरविंद वनसिंग गावीत (वय 36) व महेश मगन गावीत (वय 25) दोघ राहणार मोरकरंजा ता. नवापूर हे दहिवेल कडून साक्रीकडे अवैधरित्या गावठी दारू मोटारसायलने घेवून जात होते. त्यांची चौकशी साक्री पोलीसांनी केली असता त्यांच्याकडे प्लॅस्टीकच्या कॅरीबॅगमध्ये प्रत्येकी 2 लिटर गावठी हात भट्टीची दारू याप्रमाणे 150 कॅरीबॅग असे एकूण 300 लिटरची 6 हजार 50 रूपयांची गावठी हात भट्टीची दारू आढळून आली. अवैधरित्या गावठी दारूची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेली 60 हजार रूपये किंमतीची हिरो होंडा स्प्लेंडर गाडी क्र. एमएच 39 आर 7909 जप्त करण्यात आली आहे. आरोपीविरोधात पोकॉ विजयसिंग जबरसिंग पाटील यांच्या फिर्यादीवरून साक्री पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.