गावठी दारू पोलिसांच्या रडारवर : पोलिसांचे पथक धडकताच संशयीत पसार : रसायन केले नष्ट

Raids on hand furnaces in Yawal city and taluka : 32 thousand worth of goods seized यावल : फैजपूर डीवायएसपी यांच्या पथकाकडून तसेच यावल पोलिसांच्या पथकाकडून शहर व तालुक्यातील अंजाळे, पिंप्री या गावात गावठी हातभट्टीवर छापे टाकून 32 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिस येताच संशयीत पसार
फैजपूरचे डीवायएसपी डॉ.कुणाल सोनवणे व यावल पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांना अंजाळे, पिंप्री व शहरालगत अवैध गावठी हातभट्टीची दारू संदर्भात गोपनीय माहिती मिळाली मिळाल्यानंतर सहायक फौजदार अविनाश चौधरी, हवालदार दिलीप तायडे, सुमित बाविस्कर यांनी अंजाळे शिवारात छापा टाकत कैलास बळीराम सपकाळे (अंजाळे) हा हातभट्टीची दारू गाळताना आढळला मात्र पोलिसांचे पथक पाहून संशयीतोन हातभट्टीवरून पळ काढला. हातभट्टीवरून दहा हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

32 हजारांचा मुद्देमाल जप्त
पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले, सुशील घुगे, गणेश ढाकणे, गणेश वाघ यांच्या पथकास सूचना देत यावल-चोपडा रस्त्यावर हडकाई नदीच्या पुलाजवळ कारवाई करण्यात आली. गावठी हातभट्टीची दारू गाळणी करताना भैया भगवान शिंदे हा आढळला मात्र तो पसार झाल्यानंतर 12 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याच पथकाने पिंप्री शिवारात नदीच्या काठी छापा टाकून प्रकाश साळुंखे याच्या ताब्यातून आठ हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.