सणसवाडी । सणसवाडी येथे शिक्रापुर पोलिसांची गस्त सुरु असताना मिळालेल्या माहितीनुसार शिक्रापुर पोलिसांनी येथील सणसवाडी येथील एका गावठी दारू अड्ड्यावर छापा टाकून शिक्रापूर पोलिसांनी दारू जप्त करत दोघांना अटक केली. राजेंद्र लष्करे व हनुमंत कानडे अशी त्यांची नावे आहेत.
सणसवाडी येथे पोलिस उपनिरीक्षक प्रशांत माने, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक महेंद्र शिंदे, हवालदार दत्तात्रय शिंदे, सुरेश डुकले, विलास आंबेकर, संदीप जगदाळे हे गस्त घालत होते. त्यावेळी वसेवाडी प्राथमिक शाळेच्या पाठीमागे दोन व्यक्ती गावठी दारूची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याठिकाणी छापा टाकला असता लष्करे व कानडे गावठी दारू विकताना आढळून आले. पोलिसांनी दारूसह दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक रमेश गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार दत्तात्रय शिंदे करीत आहेत.