गावठी पिस्टलसह आरोपी भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या जाळ्यात

भुसावळ : बाजारपेठ पोलिसांनी चार गावठी कट्ट्यांसह पकडलेल्या संशयीतांच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी पुन्हा एकाच्या मुसक्या आवळल्या आहेत. संशयीताच्या ताब्यातून गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतुस जप्त करण्यात आले. शेख हमीद शेख चाँद (35, रा.निंभोरा बु.॥, ता.भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

शस्त्र तस्करामुळे लागली लिंक
रविवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास बसस्थानकाजवळील रेल्वेच्या वस्तू संग्रहालयाजवळ मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील दिपसिंह गुरूमुखसिंह कलानी याला चार गावठी कट्टे व पाच जिवंत काडतुसासह अटक करण्यात आली होती. आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर त्यास बुधवार, 23 पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. पोलिस कोठडीतील चौकशीत आरोपीने तालुक्यातील निंभोरा बु.॥ येथील शेख हमीद याला गावठी कट्टा विक्री केल्याची कबुली दिल्याने संशयीतास गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसांसह अटक करण्यात आली.

यांनी केली कारवाई
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौर, बाजारपेठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक हरीष भोये, रमण सुरळकर, निलेश चौधरी, उमाकांत पाटील, प्रशांत परदेशी, योगेश माळी, वसीम मलिक, योगेश महाजन, चालक अयाज सैय्यद आदींनी केली.