धुळे । साक्री रोड परिसरात राहणार्या एका युवकाकडे गावठी पिस्तुल असलयाची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षक एम.रामकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी दि.24 रोजी रात्री 8.45 च्या सुमारास मालेगाव रोडवरील अग्रसेन पुतळ्याजवळ सापळा रचला. 80 फुटीरोडने अग्रवालनगरकडे एम.एच.18/एन-9041या मोटरसायकलवरुन जाणार्या संशयित तरुणास थांबवून पोलिसांनी चौकशी केली.
एकूण 50 हजारांचा माल जप्त
पंकज ऊर्फ भुर्या जीवन बागले रा.रमाईनगर, साक्रीरोड,धुळे असे आरोपीचे नाव आहे. त्यानंतर पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्याची अंगझडती घेण्यात आली. यावेळी त्याच्याजवळ 15 हजारांची एक गावठी पिस्तुल, 400 रुपयांची रिकामी मॅगजिन, 5 हजारांचा एक मोबाईल, 30 हजारांची मोटरसायकल असा एकूण 50 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पंकज ऊर्फ भुर्या जीवन बागले याच्याविरुध्द विनापरवाना बेकायदेशीररित्या पिस्तुल बाळगल्याप्रकरणी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक ए.एल.शिंदे करीत आहेत.