जळगाव : शहरातील आंबेडकर नगरात गावठी पिस्टलाच्या धाकावर संशयीत दहशत निर्माण करीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाल्यानंतर आरोपीला रंगेहाथ अटक करण्यात आली. या प्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सागर सुरेश सपकाळे (28, रा.कोळीपेठ, जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपीच्या ताब्यातून गावठी कट्टा व चार जिवंत काडतूस जप्त करण्यात आले.
यांच्या पथकाने केली कारवाई
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विजयसिंग पाटील, हवालदार सुधाकर अंबोरे, नाईक विजय पाटील, प्रीतम पाटील, सचिन महाजन, पंकज शिंदे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.