गावठी पिस्तूल, काडतुसे जप्त

0

वारजे । गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक पथकाने एका सराईत गुन्हेगाराकडून एक गावठी बनावटीचे पिस्तुल व दोन काडतुसे असा 40 हजार 400 रुपयांचा ऐवज हस्तगत केला. त्याच्याविरुध्द वारजे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अक्षय अशोक टिंगरे (वय 20, रा. आकाशनगर) असे ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे.
पोलीस हवालदार अजय थोरात यांना सराईत गुन्हेगार अक्षय हा गावठी पिस्तूल घेऊन वारजे माळवाडी येथे येणार असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार दरोडा प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक राजेंद्र कदम यांच्या पथकाने दुपारी 3.45 मिनिटांनी छापा टाकून आरोपीला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक पिस्तूल व दोन काडतुसे हस्तगत करण्यात आली. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक संजय दळवी, कर्मचारी अजय थोरात, रामदास गोणते, विल्सन डिसोझा यांच्या पथकाने केली.